TMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

TMC Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Thane Municipal Corporation Job: ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ठाणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ठाणे महानगरपालिकेत ६३ जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जणार आहे.

ठाणे महानगरपालिकेने छत्रपती महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. (TMC Recruitment)

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंन्डट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदांसाठी भरती होणार आहे.शस्त्रक्रिया सहाय्यक पदासाठी १५ जागा रिक्त आहेत.न्हावी पदासाठी २ जागा, ड्रेसर पदासाठी १० जागा, वॉर्डबॉय पदासाठी ११ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी उमेदवारांची अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा ४३ वर्ष आहे. सहाय्यक शस्त्रक्रिया पदासाठी उमेदवाराने ओटी टेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत ३ वर्ष कामाचा अनुभव असावा.न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय या पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. (Thane Municiapal Corporation Job)

या नोकरीसाठी उमेदवरारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. ही मुलाखत २६,३० सप्टेंबर आणि ३, ४ ऑक्टोबर या तारखेला होणार आहे. परंतु ही तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सर्व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT