Tata Job Saam Tv
naukri-job-news

Tata Job: टाटा कंपनीत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Tata Technologies Recruitment: टाटासारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टाटा टेक्नोलॉजीमध्ये १०० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. टाटासारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. टाटा टेक्नोलॉजीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टाटा टेक्नोलॉजीमध्ये ओटोमोटिव्ह लँडस्केप बदलण्यासाठी १०० पेक्षा जास्त क्लाउड आणि डेटा इंजनियर्सची भरती केली जााणार आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. (Tata Technologies Recruitment)

टाटा टेक्नोलॉजी भविष्यात सॉफ्टवेअर आणि व्हेईकल सोल्युशन्समध्ये चांगले काम करणाऱ्या लोकांना संधी देणार आहे. यासाठी टाटा कंपनीने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. ही भरती पुणे, बंगळुरु येथे होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

टाटा टेक्नोलॉजीमध्ये क्लाउड अभियंता, डेटा इंजिनियर आणि सोल्युश आर्किटेक्टसह अनेक रपदांसाठी भरती केली जाणार आहे. क्लाउड अभियंता पदासाठी ८-१० वर्षांचा अनुभव असावा. आर्किटेक्ट पदासाछी ५-८ वर्षांचा अनुभव असावा. डेटा इंजिनियर पदासाठी ६-८ वर्षांचा अनुभव असावा. टेक्निकल हे पदासाठी १०-१२ वर्षांचा अनुभव असावा.वरिष्ठ सल्लागार पदासाठी ७-१० वर्षांचा अनुभव असावा. (TATA Technologies Recruitment 2024)

टाटा टेक्नोलॉजीमध्ये क्लाउड अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पदासाठी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत कामाचा कमीत कमीत ५ वर्षांचा अनुभव असावा. ही पदे पुणे, चेन्नई आणि बंगळुरु येथे भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती tatatechnologies.com/in/hiring-drive या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT