TATA INstitute Of Fundamental Research Job Saam Tv
naukri-job-news

तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत तब्बल १ लाख पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

चांगल्या कंपनीत जास्त पगाराची नोकरी मिळावी, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यात अनेकांचे टाटासारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. टाटा इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीआरएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. टिआरएफमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही भारत सरकारची अणुऊर्जा विभागाची संस्था आहे.त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. (Tata Jobs)

टिआरएफमध्ये सायंटिफिक ऑफिसर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सुपरवायजर कॅन्टीन, क्लर्क, वर्क असिस्टंट अशा अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्जमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेतून आयटीआय/बारावी / ग्रॅज्युएशन / बीई / बीटेक / कॉम्प्युटर सायन्स, आयटी इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

टिआरएफमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी विविध विषयात पदवी आणि मास्टर्स केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

टाटा इन्स्टिट्यूटच्या या भरतीसाठी २८ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटात सवलत देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८५०० ते १ लाख १० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाणार आहे. (Tata Institute Of Fundamental Research Job)

टिआरएफमधील या नोकरीसाठी उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. उमेदवारांना मुदतीपूर्वी अर्जाची हार्ड कॉपी प्रशासकीय अधिकारी, रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्ज १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४०००५ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवार यांनी लावली पैंज; पैंज लावताना केलं मोठं वक्तव्य | Politics

Maharashtra News Live Updates : शिवसृष्टी व भीम सृष्टी स्मारकाच्या अनावर कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

Health Tips: घामाच्या वासामुळे त्रस्त असाल तर 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

Doraemon चा आवाज देणाऱ्या अभिनेत्रीचं निधन

Heavy Rain : जळगाव, धुळ्यात परतीचा जोरदार पाऊस; मका, ज्वारीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT