SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: तरुणांना बँकर होण्याची सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

State Bank Of India Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी आहे. विशेष कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

या भरतीमध्ये विकास व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, व्हीआर व्हेल्थ, इनव्हेस्टमेंट ऑफिसर, रिजनल हेड या पदासाठी रिक्त जागा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १९ जुलैपासून सुरु झाली आहे. bank.sbi/careers या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२४ आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची पात्रता आणि अनुभवाच्या निकषावर मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे त्यात बायोडेटा, आयडी प्रुफ, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता ही सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

या भरतीमध्ये सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड ) रेगुलर पदासाठी २ रिक्त जागा आहेत तर सेंट्रेल रिसर्च टीम (सपोर्ट)रेगुलर पदासाठी २ रिक्त जागा आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नोलॉजी पदासाठी १ रिक्त जागा आहे तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिजनेस) पदासाठी २ रिक्त पदे आहेत. तसेच रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड या पदांसाठीही रिक्त जागा आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना विनाशुल्क अर्ज करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT