SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खेळाडूंसाठी मोठी भरती; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

State Bank Of India Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खेळाडूंसाठी विशेष भरती जाहिर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत बँकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर (Sportsperson),क्लेरिकल (Sportsperson) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

ऑफिसर पदासाठी एकूण १७ जागा रिक्त आहेत. तर क्लेरिकल पदांसाठी ५१ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची १४ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. अधिकारी पदासाठी उमेदवाराने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे. sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. क्लेरिकल पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. ५१ जागांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन या स्पोर्टस बोर्डामध्ये काम करण्याची संधी मिळेल.

भारतीय स्टेट बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.sbi.co.in या वेबसाइटवर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT