SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती; परीक्षा न देताच मिळणार नोकरी, असा करा अर्ज

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. लिपिक आणि ऑफिसर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कॉर्पोरेटद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (State Bank Of India Recruitment)

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक आणि अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. हे वेतन पदानुसार वेगवेगळे असणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.२० ते ३० वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीमध्ये अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ३ वर्षात आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये देशाचे नेतृत्व केलेले असावे. तर लिपिक पदासाठी राज्याचे किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (SBI Job)

या नोकरीसाठी एकूण ६८ पदे भरती केली जाणार आहे. संपूर्ण भारतात ही भरती केली जाणार आहे. १४ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याचसोबत आयबीपीएसद्वारे विविध बँकामध्ये भरती करण्यात येणार आहे. यामध्ये लिपिक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Madhuri Dixit Birthday: माधुरीला अभिनय नाही 'या' क्षेत्रात करिअर करायचं होतं; अशी बनली बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'

बंगळूरू ते हैदराबाद प्रवास फक्त २ तासांत, तर चेन्नईला पोचाल ७५ मिनिटात; हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

SCROLL FOR NEXT