SSC GD Bharti Saam Tv
naukri-job-news

SSC GD Bharti:खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तब्बल ३९,४८१ जागांसाठी मेगाभरती; शैक्षणिक पात्रता अन् वयाची अट काय? जाणून घ्या...

SSC GD Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोगाद्वारे तब्बल ३९,४८१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे कर्मचारी निवड आयोगात नोकरीची संधी आहे. कर्मचारी निवड आयोगात तब्बल ३९,४८१ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), ITBP ही पदे भरती केली जाणार आहे.

सचिवालय सुरक्षा दल (SSF), रायफलमन, NCB मध्ये शिपाई पदासाठी भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. नोकरीसाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. १८ ते २३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित टेस्ट घेऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर शारीरिक टेस्ट, वैद्यकीय तपासणीनंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे.

सध्या भारतीय नौदलातदेखील विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ज्यांना देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यांनी इंडियन नेवीच्या या भरतीमध्ये नक्की अर्ज करा. शॉर्ट कमिन्स ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT