MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Recruitment: दहावी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

MSRTC Job Opportunity: दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी पास, आयआयटी आणि व्होकेशनल यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज स्विकारले जात आहेत. राज्य परिवहन मंडळ विभागातर्फे या नोकरीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एसटी महामंडळात ४३६ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरु आहे. १० वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष असावे. १ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ही पदभरती केली जाणार आहे.

मॅकेनिक मोटार वाहन, शीट मेटल कामगार, मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेन्टर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. नाशिक हे नोकरीचे ठिकाण असेल. तर दहावी पास उमेदवारांसाठीही विविध नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी वेबसाइटला भेट द्या.

ही नोकरी शिकाऊ पदांसाठी आहे. यासाठी तुम्ही अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन, विभागीय कार्यलय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे पाठवायचे आहेत. १३ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख आहे.

सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, स्टाफ सिलेक्शनमध्ये मोठी पदभरती सुरु आहे. या नोकरीसाठीदेखील तुम्ही अर्ज करु शकतात. यासाठी तुम्ही त्या विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT