SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होण्याची संधी; १४९७ पदांसाठी भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १४९७ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. (State Bank Of India Recruitment)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजर सिस्टम (मॅनेजमेंट )साठी १८७ पदे रिक्त आहे. डेप्युटी मॅनेजर इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाउड ऑपरेशन्ससाठी ४१२ पदे रिक्त आहेत. डेप्युटी मॅनेजर नेटवर्किंग ऑपरेशन्ससाठी ८० पदे रिक्त आहे.आयटी आर्किटेक्टसाठी २७४ पदे रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजरसाठी ७८४ पदे रिक्त आहेत.

या नोकरीसाठी डेप्युटी मॅनेजर पोस्टसाठी शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यामध्ये ग्रुप डिस्कशन केले जाईल. याला १०० गुण असतील. असिस्टंट मॅनेजर पोस्टसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा घेतली जाईल. (SBI Jobs)

बँक ऑफ बडोदा भरती (Bank Of Baroda Bharti)

बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती सुरु आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बीसी सुपरवायजर पदासाठी भरती जाहीर केली जाणार आहे. या नोकरीसाठी २१ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ११ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birth Numerology: या तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत विश्वासू; जिंकतात सर्वांची मने

Ranbir Kapoor Net worth : अबब! एका चित्रपटासाठी रणबीर कपूर किती घेतो मानधन? आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Pune Crime: CBI मधून बोलतोय..., पुण्यातील इंजिनिअर तरुणीला घातला ३.५० कोटींचा गंडा

Kalyan News : नामांकित कंपनीच्या नावाने बनावटी तूप विक्री; कल्याणमध्ये महिलेला ताब्यात घेत ७० किलो तूप जप्त

Maharashtra News Live Updates : माजी केंद्रीय मंत्री दानवेंच्या मुलीच्या कारला अपघात

SCROLL FOR NEXT