SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एकूण ८२१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२६ आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

कॉनकरंट ऑडिटर पदासाठी भरती

पगार मिळणार ₹८०,०००

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॉनकरंट ऑडिटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२६ आहे. एकूण ८२१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

स्टेट बँकेत कॉनकरंट ऑडिटरचे काम बँकेच्या शाखेत होणाऱ्या व्यव्हारांवर, रेकॉर्डवर आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आहेत. य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँकेचे नियम, लेखापरीक्षण कार्यपद्धती माहित असणे गरजेचे आहे.

स्टेट बँकेत या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ६३ वर्ष असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

स्टेट बँकेतील ऑडिटर पदासाठी उमेदवारांना चांगले पॅकेज मिळणार आहे. एमएमजीएस III पदासाठी दर महिन्याला ४५,००० रुपये, एसएमजीएस-IV ग्रेडला दरमहा ₹50,000, एसएमजीएस-V ग्रेडला दरमहा ₹65,000 आणि टीईजीएस-VI ग्रेडला दर महिन्याला ₹80,000 रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेबसाइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा अन् सबमिट करा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT