RBI Google
naukri-job-news

RBI Internship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

RBI Summer Internship 2025: रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला चांगल्या संस्थेत काम करायला मिळणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

समर इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज कसा करावा?

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेत काम करायला मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिप करताना तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या संस्थेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे.

रिझर्व्ह बँकेने समर इंटर्नशिपसाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. १५ ऑक्टोबरपासून अर्ज मागवण्यात आले होते. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी तुम्हाला opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. एकूण १२५ जागांसाठी ही इंटर्नशिप जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

रिझर्व्ह बँकेची ही इंटर्नशिप ३ महिन्याची असणार आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत इंटर्नशिप असणार आहे. या इंटर्नशिपसाठी तुम्हाला २०,००० रुपये स्टायपेंडदेखील मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या इंटर्नशिपसाठी पात्रता

रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी पोस्ट ग्रॅज्युएट/पाच वर्षांचा मॅनेजमेंट/ स्टॅटिक्स / लॉ / कॉमर्स / इकोनॉमिक्स / इकोनॉमिट्रिक्स / बँकिंग / फायनान्स किंवा तीन वर्षांची बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. ही इंटर्नशिप २०२६ च्या एप्रिलमध्ये होणार आहे.

अर्ज कसा करावा? (Application Process)

या इंटर्नशिपसाठी opportunities.rbi.org.in वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर Current Vacancies वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला Summer Placement वर इंटर्नशिप दिसणार आहे.

यानंतर तुम्हाला इंटर्नशिपच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paithani Contrast Blouse: पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा? रेखीव लुकसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

Hill Station: गुलाबी थंडीत बाहेर जायचा प्लान करताय? मुंबई-पुण्याजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

Ruchak Rajyog: 7 दिवसांनंतर मंगळ बनवणार ‘रूचक महापुरुष राजयोग’, गाडी, बंगला, पैसा सर्वकाही मिळणार

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

SCROLL FOR NEXT