RBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

RBI Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रिझर्व्ह बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; आताच अर्ज करा

RBI Recruitment 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच रिझर्व्ह बँकेत काम करायला अनेक तरुणांना आवडेल. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. रिझर्व्ह बँकेत मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. (RBI Recruitment)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी तुम्हाला rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

रिझर्व्ह बँकेतील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे. या भरती मोहिमेत मेडिकल कंसल्टंट पदे भरली जाणार आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच संबंधित क्षेत्रात २ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. (Reserve Bank of India Job)

या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना फक्त मेडिकल टेस्ट द्यावी लागणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज भरुन तुम्हाला रिजनर डायरेक्टर, ह्यूमन रिसोर्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट, भरती विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, कोलकत्ता क्षेत्रीय कार्यालय, १५, नेताजी सुभाष रोड, कोलकत्ता ७००००१ येथे पाठवायचा आहे.

रिझर्व्ह बँकेत कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी उमेदवारांना पदानुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT