Reserve Bank Of India Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

RBI Recruitment: RBI मध्ये ग्रेड बी ऑफिसरसाठी मोठी भरती; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Reserve Bank Of India Recruitment 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसरसाठी पदभरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावरच तुम्ही या नोकरीसाठी पात्र ठरु शकता.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.दरवर्षी परिक्षेच्या आधारे ही भरती केली जाते. यावर्षी होणाऱ्या परिक्षेबाबत आरबीआयने अधिसूचना जाहीर केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, या वर्षी एकूण ९४ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी भरतीची जाहिरात २४ जुलै रोजी अधिकृत वेबसाइटवर देण्यात येईल. या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी opportunities.rbi.org.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना नोकरीसाठी ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रेड बी अधिकारी पदासाठी उमेदवारांनी किमान ६० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असावी. तर ग्रेड बी ऑफिसर (DEPR)पदासाठी अर्थशास्त्र किंवा त्यासंबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पीजी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ग्रेड बी (DSIM) साठी ५५ टक्के गुणांसह पदव्युतर शिक्षण घेतलेले असावे. या नोकरसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT