Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, पॅरामेडिकल पदांसाठी होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

RRB Paramedical Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या पॅरामेडिकल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

पॅरामेडिकल स्टाफ पदांसाठी भरती

लेखी परीक्षेद्वारे होणार भरती

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने पॅरामेडिकल स्टाफ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वेने या भरतीसाठी अधिसूचनादेखील जाहीर कली आहे. तुम्हाला आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर या नोकरीबाबत सविस्तर माहिती मिळाले.

आरबीआरबच्या पॅरामेडिकल भरतीमध्ये नर्सिंग, सुपरिंटेंडेंट, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

रेल्वेतील पॅरामेडिकल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तसेच १० सप्टेंबरपर्यंत तुम्ही फी भरु शकतात.

पदांची माहिती

नर्सिंग सुपरिंटेडेंट-२७२ पदे

डायलिसिस टेक्निशियन-४ पदे

हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड २-३३ पदे

फार्मासिस्ट-१०५ पदे

रेडियोग्राफर एक्स-रे टेक्निशियन-४ पदे

ईसीजी टेक्निशियन- ४ पदे

लॅबोरेटरीज असिस्टंट टेक्निशियन- १२ पदे

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान,राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यागदेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्ग, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चिक करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांटी निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.यामध्ये प्रोफेशनल अॅबिलिटी, सामान्य ज्ञान, रिजनिंग, विज्ञान हे विषय असणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी १०० गुण असणार आहेत. त्यानंतर चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्क्सदेखील असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Number Change: तुमचा WhatsApp नंबर कसा बदलण्याची सोपी ट्रिक, फक्त 'हे' सोपे स्टेप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: वसईतील विहिरीत १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

AI Video Creation: व्हिडिओ मेकिंग सोपं झालं! स्क्रिप्ट अपलोड करा आणि बघा कमाल, कोणतं आहे नवीन फिचर? वाचा सविस्तर

Mithila Palkar: साउथ इंडियन लूकमध्ये मिथिलाचं सौंदर्य खुललं| PHOTO

Black Box For Tractors: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्सची सक्ती; नव्या नियमांवर संतापाची लाट

SCROLL FOR NEXT