
Summary -
फक्त ४५ पैशांत १० लाख रुपयांचा प्रवास विमा मिळू शकतो.
हा विमा फक्त ऑनलाइन कन्फर्म किंवा आरएसी तिकीटधारकांना उपलब्ध आहे.
अपघात, अपंगत्व, मृत्यू आणि रुग्णालय खर्च यांचा समावेश आहे.
दावा करण्यासाठी थेट विमा कंपनीशी संपर्क साधावा लागतो.
रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे अपघाताच्या अनेक घटना नेहमी समोर येतात. यामध्ये कधी कुणाचा जीव जातो, कुणी जखमी होते तर कुणाला कायमचं व्यंगत्व येते. अशावेळी जर तुमच्याकडे कोणताही विमा नसेल तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. भारतीय रेल्वेने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांसाठी अगदी कमी किमतीत विमा उपलब्ध करून दिला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीवर ऑनलाइन तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना खूप कमी किमतीत जबरदस्त प्रवास विम्याचा पर्याय मिळतो. महत्वाचे म्हणजे फक्त ४५ पैशांमध्ये तुम्हाला १० लाख रुपयांचा विमा मिळू शकतो.
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी प्रवास विमा योजनेअंतर्गत फक्त ४५ पैशांच्या प्रीमियमवर १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. ही योजना भारतीय रेल्वे आणि अनेक विमा कंपन्यांच्या भागीदारीत चालवली जात आहे. या योजनेचा चांगला फायदा रेल्वे प्रवाशांना घेता येऊ शकतो.
हा विमा फक्त अशा प्रवाशांनाच उपलब्ध आहे ज्यांच्याकडे कन्फर्म किंवा आरएसी तिकिटे आहेत आणि जे आयआरसीटीसीद्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करतात. रेल्वे स्टेशनवरील तिकीट काउंटरवरून खरेदी केलेल्या तिकिटांना किंवा वेटिंग तिकिट धारकांना या विम्याचा लाभ मिळणार नाही. त्याचसोबत ५ वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं आणि परदेशी पर्यटक हे या विम्यासाठी पात्र नाही. आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून तिकिटे बुक करतात त्यांना या विम्याचा लाभ घेता येणार नाही.
रेल्वे प्रवाशांनी हे विमा संरक्षण कसे मिळवायचे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. ऑनलाइन तिकीट बुकिंग करत असताना प्रवाशाला विमा पर्याय निवडावा लागतो. तिकीट बुक केल्यावर तिकिटात ४५ पैशांचा प्रीमियम जोडला जातो. तिकीट बुक केल्यानंतर विमा कंपनी ईमेल किंवा एसएमएसद्वारे पॉलिसी आणि नॉमिनी अपडेट लिंक पाठवते. दाव्यासाठी नॉमिनीची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.
हे विमा कव्हर रेल्वे अपघात, रेल्वे रुळावरून घसरणे,रेल्वेची टक्कर, दहशतवादी हल्ले आणि इतर अनपेक्षित घटनांना लागू होतात. त्यामध्ये किती पैसे मिळतात हे वाचा...
- रेल्वे प्रवासादरम्यान अपघातात मृत्यू झाल्यास - १० लाख रुपये
-रेल्वे अपघातामध्ये संपूर्ण कायमचे अपंगत्व आल्यास - १० लाख रुपये
- अंशतः कायमचे अपंगत्व ७.५ लाख रुपयांपर्यंत विमा कवच
-रुग्णालयाचा खर्च २ लाख रुपयांपर्यंत.
- मृतदेह वाहून नेण्याचा खर्च १०,००० रुपये.
जर रेल्वे अपघात झाला तर पॉलिसीधारक किंवा नॉमिनीला थेट विमा कंपनीशी संपर्क करावा लागेल. आयआरसीटीसी या प्रक्रियेत सहभागी होत नाही. आवश्यक कागदपेत्रे विमा कंपनीच्या वेबसाइटवर किंवा एसएमएस लिंकवर उपलब्ध करून दिली आहेत. ही योजना प्रवाशांना अतिशय कमी खर्चात मोठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते आणि रेल्वे प्रवास आणखी सुरक्षित करते. त्यामुळे हा प्रवास विमा प्रवाशांसाठी भविष्यात खूपच फायदेशीर ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.