Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेची सर्वात मोठी भरती! ३२४३८ रिक्त जागा; पात्रता काय? कोणत्या पदासाठी किती पगार? जाणून घ्या सर्वकाही

Railway Recruitment 2025: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सर्वांचीच इच्छा असते. रेल्वे नेहमीच नवनवीन भरती जाहीर करत असतात. रेल्वेने नुकतीच ग्रुप डी पदासाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

शिक्षण

रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.ग्रुप डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेची आहे. तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणेदेखील गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या विभागात भरती

रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सायन्स अँड टेक्नोलॉजी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक लोको शेड (डिझेल),सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक भरती,पॉइंट्समन B, ट्रॅक मेटेंरनर या पदासाठी आहे.ग्रुप डी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कर्मचारी रेल्वे ट्रॅक, कोच, स्टोअर्सची देखभाग करावी लागते.

निवड

रेल्वेतील ग्रुप डी पदांसाठी उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणीदेखील केली जाणार आहे. कॉमप्युटर बेस्ड परीक्षा ही दीड तासाची असणार आहे.

पगार

रेल्वे ग्रुप डी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. या नोकरीसाठी सुरुवातीला १८००० रुपये पगार दिला जाईल. याशिवाय महागाई भत्ता आणि इतर अनेक भत्तेदेखील दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT