Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये १३०० हून अधिक जागांसाठी बंपर भरती;पात्रता आणि अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेत जवळपास १३०० हून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे बोर्डाने पॅरामेडिकल भरती २०२४ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये १३०० हून अधिक जागांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

रेल्वेच्या या भरतीमध्ये Dietitian,नर्सिंग सुपरीटेंडेंट, डेंटल, क्लिनिकल सायकोलोजिस्ट,लॅब सुपरीटेंडेट अशा अनेक जागांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. १७ ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२४ आबे. तर अर्जात काही बदल करायचा असेल तर १७ ते २६ सप्टेंबरपर्यंत विंडो ओपन असणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी संबंधित विषयात मेडिकल डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात येणार आहे. १८ ते ४३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.याबाबत अधिक माहिती रेल्वे बोर्डाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड

टेस्टद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.त्यानंतर मेडिकल टेस्ट केली जाईल. यानंतर उमेदवारांचे मुल्यांकन केले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शॉर्ट लिस्ट केले जाईल. या नोकरीसाठी अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारी १६ सप्टेंबर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT