Railway Recruitment Saam tv
naukri-job-news

Railway NTPC Recruitment: खुशखबर! रेल्वेत ८,८७५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway NTPC Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत ८,८७५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीची संधी

रेल्वेत विविध पदांसाठी भरती

रेल्वे एनटीपीसीमध्ये ८,८७५ पदांसाठी भरती

सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने नवीन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आरआरबीने २०२५ एनटीपीसीसाठी भरती जाहीर केली आहे. ८,८७५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामधील ५,८१७ पदे हे ग्रॅज्युएट आणि ३,०५८ पदे अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेत एनटीपीसी पदांसाठी भरती

ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट अशा दोन पदांसाठी ही भरती होणार आहे. पदवीधर पदासाठीच्या सर्वाधिक जागा या मालगाडी प्रबंधक पदाासठी आहे. ३,४२३ जागा या पदासाठी राखीव आहे. याचसोबत ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट पदासाठी ९२१ जागा रिक्त आहे. स्टेशन मास्तर पदासाठी ६१५ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वेत ग्रॅज्युएट पदासाठी सिनियर क्लर्क कम टायपिस्ट (६३८ पद), चीफ कमर्शियल कम तिकिट सुपरवायइजर (१६१ पद) आणि मेट्रो रेल्वेत ट्राफिक असिस्ंटट पदासाठी ५९ जागा रिक्त आहेत. याचसोबत नॉन ग्रॅज्युएट म्हणजे १२वी पास पदांसाठीही जागा रिक्त आहेत.यामध्ये कमर्शियल कम तिकिट क्लर्क पदासाठी २४२४ जागा रिक्त आहेत. अकाउंट्स कम टायपिस्ट पदासाठी ३९४ पदे, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट पदासाठी १६३ जागा रिक्त आहेत. ट्रेन क्लर्क पदासाठी ७७ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

अर्ज कसा करावा? (Railway NTPC Application Process)

या नोकरीसाठी तुम्ही www.rrbcdg.gov.in वर जाऊन अर्ज करावेत.

यामध्ये होमपेजवर दिलेल्या टॅबवर क्लिक करा.

यानंतर ई मेल आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावे.

यानंतर तुमची सर्व माहिती, पदाची माहिती भरावी.

यानंतर फोटो आणि सही अपलोड करा.

यानंतर शुल्क भरावे आणि फॉर्म जमा करा. तुम्ही फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.

निवड प्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड सीबीटी-१ (स्क्रिनिंग टेस्ट), सीबीटी २ (विशिष्ट परीक्षण) द्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण नगर मार्गावरील शहाड पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

Moong Chilla: नाश्त्याला चटपटीत अन् हेल्दी खायचंय मग हा पदार्थ नक्की करा ट्राय

Aai Tuljabhavani : सुरक्षा, आनंद, शांती अन् वैभव...; 'आई तुळजाभवानी' मालिकेत साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन

Mumbai Local: धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला लागला, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Abrar Ahmed: अर्शदीप, जितेश आणि हर्षितने उडवली अबरारची खिल्ली; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT