Railway Jobs Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: रेल्वेत नोकरी अन् २५०००० रुपये पगार; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वे मंत्रायलयाद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेत मंत्रालयाअंतर्गत असलेल्या PSU कंपनी रेल्वे इंडिया टेक्निकल आणि इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. RITES कंपनीत इंडिविजुअल कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Railway Jobs)

RITES कंपनीत या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६३ वर्ष असावी. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

RITES कंपनीत इंडिविजुअल कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन /आयटीमध्ये इंजिनियरिंग केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला किमान ७ वर्षांचा संबंधित फिल्डमध्ये कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराची पोस्टिंग अहमदाबाद येथे होईल. (RITES Recruitment)

इंडिविजुअल कंसल्टंट पदासाठी वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे. मुख्य सिंग्नलिंग सिस्टीम इंजिनियर किंवा मुख्य रेजिडेंट इंजिनियर (सिग्नलिंग) पदासाठी २,५०,००० रुपये वेतन मिळणार आहे. सिनियर प्लानिंग आणि शेड्युलिंग स्पेशलिस्ट पदासाठी २,००,००० ते २,५०,००० रुपये पगार दिला जाणार आहे.

क्वालिटी अशुरन्स आणि क्वालिटी कंट्रोल स्पेशलिस्ट पदासाठी ८५,००० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर एनवायरमेंट स्पेशलिस्ट/नॉइज अँड वायब्रेशन स्पेशलिस्ट पदासाठी २,००,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केले जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. या नोकरीसाठी मुलाखत हे RITES कार्यालय, शिखर, प्लॉट नंबर ०१, सेक्टर २९, गुरुग्राम येथे होईल. याबाबत अधिक माहितीसाठी अधिसूचना चेक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : अवघ्या सहा हजार रूपयांपासून सुरु केला बिझनेस, आज ५ कोटींच्या कंपनीचा आहे मालक

Maharashtra Politics: महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या भूमिकेने सस्पेन्स वाढला; दिल्लीमधील बैठकीत महत्वाचा निर्णय

Sunny Deol : शाहरुख-सनीमध्ये 16 वर्ष वैर, नेमकं काय घडलं?

Mahayuti CM Candidate News : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला ? कोणाच्या गळ्यात पडणार माळ, पाहा Video

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे आणि रमेश चैनीतला यांच्यात बैठक सुरू

SCROLL FOR NEXT