IRCTC Job Saam Tv
naukri-job-news

IRCTC Job: रेल्वेमध्ये नोकरी अन् महिना २ लाख पगार, IRCTC मध्ये निघाली भरती; जाणून घ्या सर्वकाही

IRCTC Recruitment 2024: आयआरसीटीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

Siddhi Hande

भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझ्म कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये म्हणजेच आयआरसीटीसीमध्ये नोकरीची संधी आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

रेल्वेत नोकरी करायचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. आयआरसीटीसीमध्ये AGM/DGM आणि डेप्युटी मॅनेजर (फायनान्स) या पदांसाठी भरती जाहीर करण्यासाठी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. irctc.co.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही याबाबत सर्व माहिती मिळवू शकतात. (Railway Job)

आयआरसीटीसीमध्ये (IRCTC Job) या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

आयआरसीटीसीच्या या भरती मोहिमेत निवड झालेल्या उमेदवारांना चांगले वेतन देण्यात येणार आहे. AGM/DGM पदासाठी १५,६०० ते ३९,१०० रुपये वेतन मिळणार आहे. तर डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ७०,००० ते २,००,००० पर्यंत वेतन मिळणार आहे.

आयआरसीटीसीमध्ये या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी चांगली तयारी करावी. (IRCTC Recruitment)

या नोकरीसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.यासाठी फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरुन रेल्वे बोर्डाला पाठवावा लागेल.यामध्ये विलिजेंस हिस्ट्री, डीएआर क्लिअरन्स आणि तीन वर्षांचा APAR रिपोर्ट्स द्यावा लागेल. अर्जाची कॉपी तुम्हाला depuatation@irctc.com यावर ई-मेल करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT