Railway Job Saam Tv
naukri-job-news

Railway Job: १२वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; पगार २२०००; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Railway Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या साउथ वेस्टर्न रेल्वेत ग्रुप बी आणि सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.रेल्वेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असं अनेक तरुणांना वाटतं. जर तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

साउथ वेस्टर्न रेल्वेमधील नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

दक्षिण पश्चिम रेल्वेत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी भरती केली जाणार आहे. स्पोर्ट्स कोटाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित खेळातील प्रमाणपत्र (बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, क्रिकेट)असायला हवे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सहाय्यक कार्मिक अधिकारी/ मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे- मुख्यालय कार्यलय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबळी-५८००२० येथे अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी तुम्हाला २०,२०० रुपये पगार मिळणार आहे.तसेच इतर भत्तेदेखील दिले जाणार आहे.

डीआरडीओमध्ये नोकरी

डीआरडीओमध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. डिस्टिंग्विश फेलोशिप आणि डीआरडीओ फेलोशिप पदासाठी ही भरती केली जाणार आहे. यामधील डिस्टिंग्विश फेलोशिप पदासाठी उमेदवारांना १.२५ लाख रुपयांचे वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT