Railway Job Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा?

Railway Recruitment 2025: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. रेल्वेत तब्बल ४००० पेक्षा जास्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकजे आहे. रेल्वे भरती बोर्डाने ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीबाबत जाहिरात रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुुर आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही onlineregister.org.या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

साउथ सेंट्रल रेल्वेकडून ही भरती जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये कंडिशनिंग, कारपेंटर, डीझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डक या पदांसाठी भरती जाहीर करण्या आली आबे. ४२३२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. (Railway Recruitment 2025)

रेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.या नोकरीबाबत सविस्तर महिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वयोगटातील असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. (Railway jobs)

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती

सध्या हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चार्जमॅन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन ए आणि बी, मायनिंग मेट अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT