PNB Recruitment Saam Tv
naukri-job-news

PNB Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी, ३५० जागांसाठी भरती; पगार तब्बल १ लाख रुपये, कसा कराल अर्ज?

Punjab National Bank Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब नॅशनल बँकेत सध्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे चांगल्या सरकारी बँकेत ऑफिसर होण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

पंजाब नॅशनल बँकेत भरती करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी ३५० रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे.

या नोकरीबाबत अधिसूचना वेबसाइटवर देण्यात आले आहेत.या नोकरीसाठी २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५९ शुल्क मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरु शकतात.

पंजाब नॅशनल बँकेत क्रेडिट ऑफिसर पदासाठी ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे.सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर मॅनेजर पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT