Punjab National Bank Recruitment
Punjab National Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Punjab National Bank Recruitment: तरुणांसाठी सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत २७०० शिकाऊ पदांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

Siddhi Hande

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरु आहेत. बँकेत शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबत बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. बँकेने २७०० शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेत शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० जून २०२४ पासून सुरु झाली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला याबाबत अधिक माहिती मिळेल. १४ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शिकाऊ पदांसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरु शकतात.

पंजाब नॅशनल बँकेची ही भरती भारतातील सर्व राज्यांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सबमिट करावी लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराला त्याच्या राहत्या राज्यातील स्थानिक भाषा येणे गरजेचे आहे. या भाषेतून लिहणे, वाचणे आणि समजून घेण्याचे ज्ञान त्याला असणे गरजेचे आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय किमान २० वर्ष आणि कमाल २८ वर्ष असावे. उमेदवाराचा जन्म ३० जून १९९६ ते ३० जून २०२४ नंतर झालेला नसावा. या भरतीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सूट देण्यात आली आहे. या भरतीमध्ये अर्जदारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर स्थानिक भाषा टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे नोकरी मिळणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा २८ जुलै २०२४ ला होणार आहे. यात सामान्य ज्ञान, इंग्रजी, रीझनिंग आणि कॉम्प्युटर नॉलेज या विषयांवर परीक्षा होणार आहे.या भरतीसाठी अर्ज करताना शुल्क भरावे लाणार आहे. सामान्य गटातील लोकांना ८०० रुपये+ GST भरावा लागणार आहे. तर महिला आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील लोकांना ६०० रुपये+ GST शुल्क भरावे लागणार आहे.

शिकाऊ पदासाठी ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना २ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ५० आठवडे हे ट्रेनिंग दिले जाईल. यासाठी महिन्याला स्टयपेंडदेखील मिळेल. ग्रामीण भागात १०,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. शहरी भागात १२ हजार रुपये स्टायपेंड तर मेट्रो सिटीत १५ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: मुसळधार पडणाऱ्या पावसाचा पश्चिम रेल्वे सेवेला फटका

Remove Odour From Shoes : पावसाळ्यात तुमच्याही शूजमधून कुबट वास येतोय? तर 'हे' उपाय करा...

Jitendra Awhad News: नागालँड केस संदर्भात आव्हाडांची प्रतिक्रिया!

Sharad Pawar Video: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता

Health Benefits : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणे असते शरीरासाठी चांगले

SCROLL FOR NEXT