PMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

Pune Mahanagpalika Bharti: खुशखबर! पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

Pune Mahanagpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. सध्या एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत भरती सुरु आहे. या नोकरीसाठीची पात्रता वाचा.

Siddhi Hande

पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिकेद्वारे भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे चांगल्या विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. (PMC Recruitment)

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटसाठी पुणे मनपा रुग्णालयातील FICTC केंद्रासाठी रिक्त पदे भरली जाणार आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती सर्व माहिती देण्यात आली आहे.

पात्रता

पुणे महानगरपालिका, पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. समुपदेशक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच मास्टर ऑफ सोशल वर्क पदवी असावी. एच.आय.व्ही एड्स विषयी काउंसलिंगचा ३ वर्षाचा अनुभव असावा.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी एस.सी. व डि.एम.एल.टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच एच आय व्ही रक्तचाचणी लॅबमध्ये ३ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. एकूण १२ पदे भरण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी ९ जुलै २०२५ पर्यंत अर्ज पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार कागदपत्रे पाठवायची आहेत. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला पासपोर्ट साइज फोटोदेखील पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज पुणे शहर एड्स निंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT