PMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ६८१ पदांसाठी भरती सुरु; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Pune Municipal Corporation Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. पुणे महानगरपालिकेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती जाहीर केली आहे. पुणे महानगरपालिकेत ६८१ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.

पुणे महानगरपालिकेत नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. युवा प्रशिक्षण पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून १२वी पास/इंजिनियिरिंग डिप्लोमा/ डिग्री (B.Tech)प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील अर्ज पाठवू शकतात. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे येथे अर्ज पाठवायचा आहे.

१८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १२वी पास उमेदवारांना ६०० रुपये वेतन मिळणार आहे तर डिप्लोमा/ ITI उमेदवाराला ८००० रुपये वेतन मिळणार आहे. तसेच पदवीधर आणि पदव्युतर उमेदवारांना १०,००० रुपये वेतन मिळणार आहे.

याचसोबत ठाणे महानगरपालिकेतदेखील विविध रिक्त पदे आहेत. ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकारी ते परिचारिका अशा अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT