ONGC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; १२ लाखांचे पॅकेज मिळणार;अर्ज कसा करावा?

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी करण्यात आली आहे. ओएनजीसी गोवा स्थित अॅडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

ओएनजीसीमध्ये नोकरीची संधी

विविध पदांसाठी भरती

पगार मिळणार १२ लाख रुपये

चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ओएनजीसी गोवा स्थित अॅडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ३ मार्चपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

ओएनजीसीमधील ट्रेनिंग सेंटरसाठी हेड (कॅटरिंग), हेड (हाउसकिपिंग), हेड (कंसीर्ज) या पदासांठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच या क्षेत्रात ७ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने याआधी २ स्टार, ३ स्टार हॉटेलमध्ये काम केलेले असावे.

हेड (हॉर्टिकल्चर) पदासाठी हॉर्टिकल्चर, अॅग्रीकल्चर किंवा फ्लोरीकल्चरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. यासाठी ७ वर्षांचा अनुभव असावा. हेड (ट्रेनिंग अँड डायविंग) पदासाठी भारतीय नौसेनेतून डायवर ट्रेड सर्टिफिकेट किंवा PADI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. उमेदवारांकडे अनुभव असायला हवा.

१२ लाखांचे पॅकेज मिळणार

कॅटरिंग हेड, हाउसकिपिंग हेड, हॉर्टिकल्चर हेड या पदांसाठी निवड झाल्यावर १२ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. हेड (कंसीयर्ज अँड ओवरऑल एक्सपीरियंस) पदासाठी १० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला ongcindia.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करुन फॉर्म फिरायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

Famous Actor Died: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्यााआड; झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

PPF, NPS किंवा सुकन्या समृद्धी योजनेत खातं आहे? ३१ मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाउंट

युद्धाचा मुंबईला मोठा फटका; गॅस तुटवड्यामुळे २०% हॉटेल्स बंद, आकडा ५० टक्क्यांवर जाण्याची भीती

Walking Benefits: चालण्यामुळे स्ट्रेस कसा कमी होतो? जाणून घ्या चालण्याचे ७ महत्त्वाचे फायदे

SCROLL FOR NEXT