ONGC Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

ONGC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी कंपनीत नोकरी; ONGC मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

ONGC Recruitment 2025: ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ओएनजीसीमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

ओएनजीसी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. ओएनजीसीमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत ऑनलाइन अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. ओएनजीसीमधील या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

ओएनजीसीमधील (ONGC) या भरती मोहिमेत एकूण २६२३ अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी अजून २० दिवस आहेत.

अप्रेंटिस पदाासाठी १८ ते १४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी आणि बारावी पास केलेले असावे. याचसोबत उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट, बीई, बीकॉम, बीएससी, बीबीए आणि बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना १२,३०० रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना १०,९०० रुपये, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ८,२००- १०५६० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा? (Apply Now)

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जावे.

त्यानंतर अप्लाय लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा.

यानंतर शैक्षणिक पात्रतेची माहिती भरा. यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करा आणि त्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Mulyachi Bhaji Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा गावाकडे बनवतात 'तशी' मुळ्याची भाजी, वाचा खास रेसिपी

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT