ONGC Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Government Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; ONGC मध्ये भरती सुरु; पगार किती? जाणून घ्या

ONGC Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ओएनजीसीमध्ये सध्या भरती सुरु आहे.अप्रेंटिस पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि कामाचा अनुभव घ्यायचाय त्यांच्यासाठी ओएनजीसीमध्ये काम करण्याची उत्तम संधी आहे. ओएनजीसीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम NAPS पोर्टल aaprenticeshipindia.gov.inकिंवा NATS पोर्टल nats.education.gov.in वर स्वतः ला रजिस्टर करुन अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार आहे. (Government Job)

या नोकरीसाठी १०वी/ १२वी / आयटीआय/बीएससी / बीई/ बीटेक ही पदवी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती तुम्हाला ई-मेलद्वारे कळवण्यात येईल. यानंतर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. (ONGC Recruitment 2024)

स्टायपेंड (Stipend)

या नोकरीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ९००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण लोकांना ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.याचसोबत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ७७०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra rain: राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक; 'या' कारणामुळे गायब झाले ढग, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

Washim : निकाल लागला अन्...; शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य!

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

SCROLL FOR NEXT