ONGC Recruitment Google
naukri-job-news

ONGC Recruitment 2024: परीक्षा न देताच मिळणार सरकारी नोकरी, १ लाख ३० हजार पगार मिळणार, वाचा डिटेल्स

ONGC Recruitment 2024: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांसाठी ५० हजार ते १ लाख ३० हजार रुपयांचे मासिक वेतन मिळणार आहे.

Siddhi Hande

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती सुरु आहे. ओएनजीसीमध्ये २६२ पदांसाठी रिक्त जागा आहेत. त्यामुळे या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये भरती मोहिमेद्वारे वैद्यकीय अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज पाठवण्यास सांगितले आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २३ जून म्हणजे उद्या आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ओएनजीसीमध्ये वैद्यकीय अधिकारी, फील्ड ड्युटी, होमिओपॅथी आणि स्पेशलिस्ट, ऑक्युपेशनल हेल्थ या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी तुम्ही अर्ज करु शकता. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ongcindia.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाइटवर अर्ज कसा भरायचा, या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे याबाबत माहिती दिली आहे.

या पदांसाठी २६२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांना मिळालेले गुण आणि मुलाखतीच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

उमेदवारांच्या निवडप्रक्रियेसाठी त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात मिळाळेल्या गुणांना ७० टक्के वेटेज तर मुलाखतीतील गुणांना ३० टक्के वेटेज दिले जाणार आहे. उमेदवाराच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. एमबीबीएस पदवी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. तर काही पदांसाठी एमडी पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवारांचे पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी केले जाईल. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना ५० ते १ लाख ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

SCROLL FOR NEXT