Government Jobs SAAM TV
naukri-job-news

Government Job: डिप्लोमा झालाय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या कंपनीत सुरु आहे भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Siddhi Hande

Government Job: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसी सेल पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.एनटीपीसी सेल पॉवरमध्ये डिप्लोमा ट्रेनी आणि लॅब असिस्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे. ज्या तरुणांनी डिप्लोमा केला आहे त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात करण्याची ही चांगली संधी आहे.

एनटीपीसी सेल पॉवर कंपनी लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही nspcl.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

या नोकरीबाबत कंपनीने अधिसूचना जाहीर केली आहे. ३० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यातील २४ पदे ही डिप्लोमा ट्रेनी पदासाठी असतील आणि ६ पदे ही लॅब असिस्टंट पदासाठी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. तसेच महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे.

एनटीपीसी सेल पॉवर कंपनी लिमिटेडमधील या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि त्यांच्या योग्यतेनुसार केली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा दोन विभागांमध्ये केली जाणार आहे.अॅप्टीट्यूड टेस्ट, Quantitative Aptitude,Reasoning, Technical Knowledge Test याद्वारे केली जाणार आहे. या परिक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना nspcl.co.in या वेबसाइटवर जावे लागेल. होमपेजवर करिअर ऑप्शन दिले. तिथे तुम्हाला NSPCL भरती २०२४ असा ऑप्शन दिसे. त्यावर क्लिक करुन अर्ज भरावा लागेल. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या अर्जाची प्रिंट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif: कतरिनाला झाला मधुमेहाचा आजार? दंडावरील पॅचमुळे चाहत्यांमध्ये चर्चा, पाहा Video

Pune Crime : बिबेवाडीला जाण्यासाठी स्वारगेटवरून रिक्षा पकडली अन् घडला भयंकर प्रकार; पुण्यातील घटनेने खळबळ

Live Video : रतन टाटांची अंतयात्रा | Marathi News

PAK vs ENG: पाकिस्तानमध्ये इंग्लंडने तोडला भारताचा २० वर्ष जुना विक्रम, काय होता रेकॉर्ड?

Maharashtra News Live Updates: राज्याच्या गृह विभागात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या

SCROLL FOR NEXT