Railway Jobs  Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: १०वी पास आहात? रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी; १६७९ रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Government Jobs Railway Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या रेल्वेमध्ये १६७९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

Indian Railway Jobs 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.सध्या उत्तर मध्य रेल्वेअंतर्गत भरती सुरु आहे. उत्तर मध्य रेल्वेअंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत तब्बल १६७९ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

उत्तर मध्य रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १६ सप्टेंबर २०२४ पासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ असणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर जाऊन ही माहिती वाचावी.

उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर मध्य रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (NCVT/SCVT) पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये अर्ज फी घेण्यात येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पद भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. याचसोबत सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. १००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

SCROLL FOR NEXT