NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI Recruitment: ना परीक्षा, ना इंटरव्ह्यू; थेट मिळणार सरकारी नोकरी, NHAI मध्ये भरती सुरु, पात्रता काय? वाचा सविस्तर

NHAI Recruitment 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये (NHAI Recruitment) नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी ६० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.

नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ६० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यात २७ पदे सामान्य प्रवर्गासाठी तर इतर पदे राखीव प्रवर्गासाठी आहेत. या नोकरीसाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्जावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करुन फॉर्म जमा करायचा आहे. या फॉर्मचे प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंगमध्ये बीई किंवा बीटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत GATE २०२५ मध्ये चांगले गुण असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड फक्त GATE २०२५ मध्ये मिळालेल्या स्कोअरच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी ना कोणती परीक्षा ना कोणता इंटरव्ह्यू होणार नाही.

अर्जप्रक्रिया

या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया १० मे पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून २०२५ आहे. इच्छुकांनी vacancy.nhai.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. सर्व कागदपत्रेदेखील अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढणार? विदेशी फंडिंग ईडीकडून चौकशी सुरू, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra News Live: रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्त्यांचा राडा

Jantar Mantar Viral Girl: 'आज माझा वाढदिवस आहे, मला माफ करा...'; वादग्रस्त विधानांनंतर अल्पवयीन मुलीची पहिली प्रतिक्रिया

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT