IOCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: परीक्षा नाही, मुलाखत नाही, थेट सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये भरती, जाणून घ्या प्रोसेस

Indian Oil Corporation Limited Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये ट्रेड, टेक्निशियन, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२५ आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगढ, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड येथे होणार आहे. इंडियन ऑइलमध्ये टेक्निशियन आणि नॉन टेक्निशियनसाठी ४५६ पदे रिक्त आहेत.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पदव्युतर अप्रेंटिस पदासाठी बीबीए, बीए, बीकॉम आणि बीएससी पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाहीये. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड तुमच्या गुणवत्तेवर होणार आहे. १२ महिन्यांचा अप्रेंटिसचा कालावधी असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://nr.ioclmd.in/ या वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला

कॉलेज-कोचिंगचं साटलोटं, विद्यार्थ्यांची लूट, पुण्यात 'इंटिग्रेटेड'च्या नावाखाली काळाबाजार

Jalgaon Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा जागीच मृत्यू

भाजपमध्ये मोठी फूट, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा तडकाफडकी राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिक आणि जळगाव विधानपरिषदेचा तिढा सुटेल-श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT