NIACL Recruitment Saam Tv
naukri-job-news

NIACL Recruitment: नुकतंच शिक्षण पूर्ण झालंय? NIACL मध्ये सरकारी नोकरीची संधी, अशा पद्धतीने करा अर्ज

NIACL Apprentice Recruitment 2025: NIACL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. NIACL मध्ये सध्या अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड म्हणजे एनआयएसीएलमध्ये (NIACL)नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ही भरती अप्रेंटिसशिपसाठी होणार आहे.

NIACL मध्ये ५०० रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही एनआयएसीएलच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://newindia.co.in यावर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२५ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (NIACL Recruitment)

NIACL मधील या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गासीठी २६० जागा आहेत. ईडब्ल्यूएससाठी ३९ पदे, ओबीसीसाठी ११० तर एससीसाठी ६१ पदे राखीव आहेत.

NIACL मधील या अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करणारा नागरिक भारतीय असणे गरजेचे आहे. त्य उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ एप्रिल २०२१ पूर्वी पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला ९००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. ज्यांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्य रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

SCROLL FOR NEXT