NIACL Recruitment Saam tv
naukri-job-news

NIACL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार मिळणार ९०,००० रुपये; अर्जाची स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

NIACL Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या कंपनीत अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (Generalists & Specialists/ Scale - I) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एनआयएसीएल (NIACL)मध्ये ऑफिसर होण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावेत. यासाठी तुम्ही newindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. होमपेजवर डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन अर्ज करावेत.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात किंवा स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत सीए, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटमध्ये ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. एमबीए/पीजीडीएम / फायनान्स / एमकॉम पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक फायदेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. प्रिलियम्स, मेन्स परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तुमची मुलाखत होईल. मुलाखतीत पास झाल्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ibpsonline.ibps.in/niacljul25/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करुन रजिस्टर करावे.

यानंतर सर्व माहिती भरा. फोटो आणि सही अपलोड करा.

यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. अर्ज केल्यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजू शेट्टी यांची समजूत काढणार; हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

Vehicle Insurance: वाहन विम्याच्या नियमांत मोठा बदल! १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू; कार-बाईक मालकांना काय फायदा?

Building Collapse: दिल्लीत ३ मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

Health Tips : सफरचंद की केळं?आरोग्यासाठी कोणतं फळ ठरतं जास्त फायदेशीर, जाणून घ्या

Rahul Gandhi: गोकुळ दूध संघाच्या वादात उडी राहुल गांधींची उडी, भाजपवर केला बहुमत चोरीचा आरोप

SCROLL FOR NEXT