NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI मध्ये काम करण्याची संधी; समर इंटर्नशिप सुरु; मिळणार स्टायपेंड; वाचा अर्जप्रक्रिया

NHAI Summer Internship 2026: NHAI ने समर इंटर्नशिप प्रोग्राम २०२६ सुरु होणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग आणि प्राधिकरण विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे.

Siddhi Hande

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

समर इंटर्नशिप २०२६ला सुरुवात

अर्ज कसा आणि कुठे करावा?

सरकारी विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि प्राधिकरण विभागात काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. NHAI ने समर इंटर्नशिप प्रोग्राम २०२६ साठी रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात इंटर्नशिप (NHAI Summer Internship)

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी internshipsatnhai.digitalindiacorporation.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.त्याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामधील ही इंटर्नशिप दोन महिन्याची असणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना NHAI च्या फील्ड ऑफिस आणि मुख्यालयात काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करु शकतात.

पात्रता (NHAI Internship Eligibility)

एनएचएआयमधील समर इंटर्नशिपसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. सिविल इंजिनियरिंगसोबत कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सायन्स, फायनान्स, लॉ, कॉमर्स, मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.सिविल इंजिनियर असलेल्या उमेदवारांना हायवे डिझाइन, ट्राफिक प्लानिंगसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.

५०० विद्यार्थ्यांना मिळणार संधी

या इंटर्नशिपसाठी ५०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. हा उपक्रम उच्च शिक्षण विभाग आणि All India Council for Technical Education (AICTE)ने मिळून सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT