NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI Recruitment: कोणतीही परीक्षा न देता मिळणार २ लाख रुपयांची सरकारी नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

NHAI Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. NHAI मध्ये महाव्यवस्थापक (तांत्रिक), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), मॅनेजर (तांत्रिक) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

NHAI मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. nhai.gov.in या साइटवर जाऊन अर्ज करावेत.ही भरती ६० पदांसाठी होणार आहे. जनरल मॅनेजरसाठी २० पदे आहेत. डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी २० पदे आहेत तर मॅनेजर पदासाठी २० रिक्त जागा आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय ५६ पेक्षा जास्त नसावे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६७,७०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला डीजीएम (एचआर/अॅडमिन), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्लॉट नंबर जी ५ आणि ६, सेक्टर १० द्वारका, नवी दिल्ली-११००७५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT