NCERT Recruitment Saam Tv
naukri-job-news

NCERT Recruitment: NCERT मध्ये विविध पदांसाठी सुरु आहे भरती; मिळणार १ लाख ४४ हजार रुपये मासिक वेतन;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

NCERT Recruitment: NCERT मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. NCERT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. NCERT मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. २७ जुलैपासून भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

NCERT मध्ये १२४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये ३३ पदे प्राध्यापक पदासाठी आहे. तर सहायक प्राध्यापक पदासाठी ५८ जागा आहे. असोसिट प्रोफेसर पदासाठी ३२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर असिस्टंट लायब्रेरियन पदासाठी १ जागा राखीव आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १ हजार रुपे शुल्क भरावे लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.या नोकरीसाठी प्राध्यापक पदासाी लाख ४४ हजार रुपये वेतन दिले जाईल. तर असोसिएच पदासाठी १ लाख ३१ हजार ४०० रुपये वेतन द्यावे लागेल. असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट लायब्रेरियन पदासाठी ५७ हजार ७०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

एनसीइआरटीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे. त्यामुळे मुदतीआधी या नोकरसाठी अर्ज करावेत.तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ncert.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागणार होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT