Nashik Job Saam Tv
naukri-job-news

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत १२वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; शिक्षणासोबत मिळणार कामाचा अनुभव;अशा पद्धतीने करा अर्ज

Nashik Zilla Parishad Job: नाशिक जिल्हा परिषदेत नोकरीची संधी आहे. शिक्षणासोबतच कामाचा अनुभव घेण्याची ही चांगली संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

राज्यातील सर्व तरुणांना नोकरीची संधी मिळावी किंवा त्यांना नोकरीबाबत माहिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली जाते. यामध्ये त्यांना विविध ठिकाणी नोकरी दिली जाते. या कामातून त्यांना अनुभव मिळतो. अनुभवासोबतच त्यांना महिन्याला पगारदेखील दिला जातो. यामध्ये वेगवेगळ्या सरकारी विभागात नोकरीचा अनुभव घेता येतो.

जिल्हा परिषद शिक्षण विभागात विविध पदे भरती केली दाणार आहे. या योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषद येथे तुम्हाला नोकरी मिळू शकते. या नोकरीसाठी विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.१२वी पास/आयआटीआय/पदवी किंवा पदव्युतर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

जिल्हा परिषदेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाच्या वेबसाइटवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही नोकरी देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी १२वी पास उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय पदवी प्राप्त उमेदवाराला ८ हजार रुपये तर पदव्युतर उमेदवाराला १० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuzvendra Chahal: ३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात...!

Valentine Special Cake : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि झटपट कॉफी केक, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: पार्थ पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल

Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

Office Wear Saree: ऑफिस लूकसाठी या 5 साड्या बेस्ट, तुमचा प्रोफेशनल लूक दिसेल भारी

SCROLL FOR NEXT