NABARD Recruitment 2024  Saam TV
naukri-job-news

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजार रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Recruitment News : सध्या प्रत्येक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. अशात १० वी पास तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आली आहे.

Ruchika Jadhav

१० वी पास तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फक्त १० वी पास असलेल्या तरुणांना भरघोस पगारासह बँकेत नोकरी मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये एकूण १०८ पदांसाठी भरती निघाली आहे. आता या बातमीमधून याच भरतीबाबत सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.

पदाचं नाव आणि पद संख्या

नॅश्नल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये ऑफिस अटेंडंट ग्रूप सी या पदासाठी भरती निघाली आहे. यामध्ये एकूण १०८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची जागा लवकरात लवकर भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी शैक्षणिक अट फक्त १० वी पास आहे. म्हणजे साल २०२४ मध्ये तुम्ही १० वी पास केली असेल तरी देखील या पदासाठी अर्ज करू शकता आणि नोकरी मिळवू शकता.

वयाची अट काय

बँकेत नोकरी करण्याची ही संधी मिळवण्यासाठी तुम्हाला वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असावीत. तसेच तुमचं वय ३० वर्षांहून जास्त नसावं. असं असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकनेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर या बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत भरतीची माहिती दिली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याकरीता अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख काय आहे त्याची माहिती जाणून घेऊ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी २ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. तर २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली? रात्री किती वाजता सुरु होणार सामना?

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

SCROLL FOR NEXT