MPSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MPSC Recruitment: खुशखबर! MPSCद्वारे १७३ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा अन् कुठे करावा?

MPSC Recruitment 2025: एमपीएससीद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. १७३ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एमएससीमार्फत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. वेगवेगळ्या विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट अ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत मुख्य प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र पदे तसेच विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

महाविद्यालयात डीन पदासाठी भरती

शासकीय महाविद्यालयात डीन गट अ पदांसाठी १० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. २१ मार्च ते १० एप्रिलपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला परीक्षा शुल्क १० एप्रिलपर्यंत भरायचे आहे.यामध्ये दिव्यांग, खेळाडू यांच्यासाठी आरक्षित जागा आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना M.B.B.S किंवा मेडिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

सहयोगी प्राध्यापक

याचसोबत एमपीएससीद्वारे सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.मुखशल्यचिकित्साशास्त्र पदासाठी ही भरती होणार आहे.या नोकरीसाठीही अर्ज करण्याची १० एप्रिल २०२५ शेवटची तारीख आहे.या नोकरीसाठी डेंटल सर्जरीमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. किंवा डेंटल सर्जरीमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.

विविध विषयात सहयोगी प्राध्यापक- १६२ पदे

मायक्रोबायोलॉजी, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवेद्यक शास्त्र, शरीरक्रियाशास्त्र अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १६२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी विविध पदांसाठी उमेदवारांनी त्या त्या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.

एमपीएससीमधील या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://mpsc.gov.in/adv_notification/8 या वेबसाइटववर माहिती दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT