Mazgaon Dock Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Mazgaon Dock Job: ८वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, माझगाव डॉकमध्ये भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mazgaon Dock Recruitment 2025: माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ५२३ जागांसाठी ही भरती होणार आहे.

Siddhi Hande

जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये (Mazgaon Dock Shipbuilders Recruitment) सध्या भरती सुरु आहे. माझगाव डॉकमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. जर तुमचे नुकतेच ट्रेडमध्ये डिप्लोमा किंवा आयटीआय पूर्ण झाले असेल तर ही उत्तम संधी आहे.

माझगाव डॉकमधील या नोकरीसाठी ८वी पास, १०वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे जर तुम्हाला खरंच सरकारी नोकरीचा अनुभव घ्याचा असेल तर ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. mazagondock.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज भरा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे.

पात्रता

अप्रेंटिसशिप पदांसाठी ८वी किंवा १०वी पास असणे गरजेचे आहे. पदानुसार पात्रता निश्चित केली जाईल. या नोकरीसाठी पदानुसार वयोमर्यादादेखील वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर रिक्रूटमेंट सेक्शनवर जाऊन अप्रेंटिस बटणवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्वात आधी नवीन अकाउंट बनवून रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर लॉग इन करुन अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट आउट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे.

भरती

या नोकरीसाठी विविध ट्रेडमध्ये भरती केली जाणार आहे. ५२३ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ड्राफ्टसमॅन पदासाठी २८ जागा, इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस पदासाठी ४३ पदे, फिटर पदासाठी ५२ पदे, पाइप फिटर पदासाठी ४४, स्ट्रक्चरल फिटर पदासाठी ४७ जागा, फिटर स्ट्रक्चरलर पदासाठी ४० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT