Mahatransco Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Mahatransco Recruitment: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; Mahatransco मध्ये सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Mahatransco Recruitment 2024: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महापारेषणणध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

महाराष्ट्रात सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत. १०वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

महापारेषणमध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.याबाबत अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. राज्य सरकारअंतर्गत ही कंपनी काम करते. त्यामुळे तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी आहे. १० वी पास किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

१८ ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने १०वी पास असणे आवश्यक आहे. त्याचसोबत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT)नवी दिल्ली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजयतंत्री या व्यवसायतील परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबईत नोकरीसाठी यावे लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यात आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile) अपलोड करावे लागणार आहे. सर्वात आधी कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावे लागणार आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. २३ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याचसोबत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रत ६ सप्टेंबरपर्यंत अधीक्षक कार्यालय, अउदा संवसुं मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली रोड, ठाणे- बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT