LIC Recruitment Google
naukri-job-news

LIC Recruitment: LIC मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; २०० पदांसाठी भरती सुरू; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

LIC Recruitment 2024: भारतीय आयुर्विमा महामंडळाने भरती जाहीर केली आहे. एलआयसीमध्ये ज्युनिअर असिस्टंट पोस्टसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने भरती जाहीर केली आहे. कनिष्ट सहाय्यक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. तब्बल २०० रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया २५ जुलैपासून सुरु झाली आहे. १४ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनीच या नोकरीसाठी अर्ज करावा.या नोकरीसाठी वयोमर्यादा २१ ते २८ वर्षे आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. हे दोन टप्पे पार केल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी lichousing.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

या नोकरीसाठी ज्या शहरात पोस्टिंग केली जाईल. त्यानुसार वेतन देण्यात येईल. ३२ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

Crime: परदेशातून यायचा, 10 वर्षाच्या बालिकेला दारू पाजून अत्याचार करायचा, आईच मुलीला नराधम म्हाताऱ्याकडे सोडायची

Maharashtra Live News Update: कोंढवा गोळीबार प्रकरण; पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

SCROLL FOR NEXT