Metro  Saam tv
naukri-job-news

Metro Jobs: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; मेट्रोत १२८ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Metro Recruitment 2025: कोलकत्ता मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मेट्रोत सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

मेट्रोत नोकरी करण्याची संधी

कोलकत्ता मेट्रोत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर

१०वी पास तरुण करु शकतात अर्ज

१०वी पास आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मेट्रोल नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या ठिकाणी काम करता येणार आहे. सध्या कोलकत्ता मेट्रो रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे.

कोलकत्ता मेट्रोमधील या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही mtp.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन बघू शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे.

कोलकत्ता मेट्रोमध्ये १२८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही परीक्षेची गरज नाही. मेरिट लिस्टच्याआधारे तुमची निवड केली जाणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असावे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करायचे आहे.

यानंतर तुम्हाला कोलकत्ता मेट्रोच्या वेबसाइटवर जाऊन mtp.indianrailways.gov.in फॉर्म भरायचा आहे.

यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहे.

यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे.

यानंतर फी भरुन तुम्ही अर्ज सबमिट करा. त्याआधी एकदा प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्लासला जात असल्याचं सांगितलं, बसस्थानकावर गेल्या.. तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता

Kshitish Date : मराठी प्रेक्षकांसाठी नवं नाटक; क्षितिज दाते मुख्य भूमिकेत, कुठे अन् कधी पाहता येणार?

Maharashtra Live News Update: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

Aadhaar Card: आधारकार्ड अपडेट करणं झालं आणखी सोपं; घरबसल्या कागदपत्राशिवाय करा झटपट काम

ह्रदयद्रावक! क्रिकेट खेळताना विजेचा धक्का लागला, १३ वर्षीय मुलाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT