Railway Jobs Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; १९० रिक्त पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.जर तुम्हालाही रेल्वेत सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. कोकण रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोकण रेल्वेत १९० रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने या भरतीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. कोकण रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०२४ आहे.(Kokan Railway Recruitment)

कोकण रेल्वेतील या भरती मोहिमेत ग्रॅज्युएट अप्रेंटिस/ टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी १९० पदे भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठीतून इंजिनियरिंग पदवी प्राप् केलेली असावी. तसेच टेक्निशियन पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा केलेला असावा.

कोकण रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी ४५०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी ४००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Kokan Railway Job)

या नोकरीसाठी तुम्हाला kokanrailway.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएट अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस भरती असे दिसेल.तिथे जाऊन तुम्ही आवश्यक माहिती भरुन नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०२४ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre Wedding शूटसाठी खास लोकेशन, सास-बहू मंदिराला भेट द्याच

Maharashtra News Live Updates: समीर वानखेडे विधानसभेला लढणार नाहीत, त्या फक्त अफवाच

Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

IND vs NZ 1st Test: फुल ऑन राडा! मोहम्मद सिराज LIVE सामन्यात कॉनव्हेला भिडला- VIDEO

Diwali 2024 : दिवाळीत फटाके फोडताना चिमुकल्यांची 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT