HDFC Recruitment Saam Tv
naukri-job-news

HDFC Recruitment: HDFC बँकेत नोकरीची संधी; १२ लाख रूपयांपर्यंत पगार; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

HDFC Bank Recruitment 2025: एचडीएफसी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एचडीएफसी बँकेत प्रोबेशनरी पदासाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एचडीएफसी बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे.

एचडीएफसी बँकेने रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. तुम्ही आयबीपीएसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (HDFC Recruitment 2025)

एचडीएफसी बँकेतील पीओ पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी फॉर्म प्रिंट करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी २०२५ आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.

एचडीएफसी बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालेला असावा. तसेच उमेदवाराकडे १-१० वर्षांचा सेल्समध्ये अनुभव असावा. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात. (HDFC Recruitment News)

रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५५ असावी. या भरतीमध्ये असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

एचडीएफसी बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांना ३,००,००० ते १२,००,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही आयबीपीएसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT