Jilha Nyaylay Bharti Saam Tv
naukri-job-news

Jilha Nyaylay Bharti: लातूर कोर्टात नोकरीची नामी संधी; या पदांसाठी विघाली भरती; वाचा सर्व माहिती

Jilha Nyaylay Bharti 2024: जिल्हा आणि सत्र न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. लातूर येथील न्यायालयात ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

जिल्हा न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. जिल्हा न्यायालयासारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीशाद्वारे या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयात १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

जिल्हा आणि सत्र न्यायालयात पुस्तक बांधणीकार पदासाठी नोकरीची संधी आहे. राज्य सरकारअंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून पुस्तक बांधणीबाबत कोर्स केलेला असावा.

जिल्हा व सत्र न्यायलयात २ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात भरती जाहीर करण्यात आसी आहे. या नोकरीसाठी अर्जाचा नमुना लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यामुळे तो अर्ज भरुन ऑफलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे. (Governmeny Job)

या नोकरीसाठी उमेदवारांची २० गुणांची मुल्यमापन परीक्षा घेतली जाईल. परिक्षेनंतर मुलाखतीस बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज भरुन प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे पाठवायचा आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Jilha Nyayalay Bharti)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT