ISRO Jobs  Saam Tv
naukri-job-news

ISRO Jobs : इस्रोत नोकरीची संधी; टेक्निशियन ते असिस्टंट पदासाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ISRO Recruitment: इस्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. टेक्निशियन असिस्टंट ते इंजिनियर अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती सुरु आहे.

Siddhi Hande

अनेकांची इस्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. इसरोमधील काम कसं सुरु असतं हे जाणून घेण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही इस्रोमध्ये नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. इसरोमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

इस्रोमध्ये मेडिकल ऑफिसर, शास्त्रज्ञ, इंजिनियरसह अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही www.isro.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०२४ आहे.

इस्रोची ही भरती ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटरसाठी केली जात आहे. ज्यांना इस्रोमध्ये कामाचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी नक्की अर्ज करावा. मेडिकल ऑफिसर SD,मेडिकल ऑफिसर SC, शास्त्रज्ञ, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशिन बी, ड्राक्ट्समॅन बी, असिस्टंट या पदासाठी भरती सुरु आहे. १०३ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

इस्रोच्या या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास/ITI/डिप्लोमा/एम.ई/ एम टेक/ एमबीबीएस/एमडी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. २८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सध्या पश्चिम रेल्वेतदेखील भरती सुरु आहे. स्काउट्स आणि गाइड्स पदासाठी भरती सुरु आहे. रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. याचसोबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT